महाराष्ट्र ग्रामीण

खेड भरणा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाची मागणी


खेड,दि.२९.( प्रतिनिधी)


खेड तालुक्यातील भरणा नाका येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी न्यूज मराठी लाईव्हच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

या ठिकाणी असलेला पुतळा हा शिवप्रेमींसाठी श्रद्धास्थान असून परिसराच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. मात्र सध्या पुतळ्याभोवतालचा परिसर तसेच सुशोभीकरणाच्या दृष्टीने आवश्यक कामे अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे.


पुतळ्याभोवती स्वच्छता, आकर्षक विद्युत प्रकाशयोजना, संरक्षणात्मक कुंपण तसेच सौंदर्यीकरणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या शिवभक्तांना योग्य सन्मानभावना राखून दर्शन घेता येईल, असे मत न्यूज मराठी लाईव्हच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.


प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर सुशोभीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button